Shivsena On Kirit Somaiya | राणेंच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग पाडण्याच्या आदेशाचे स्वागत, सोमय्या आता पहिला वार करणार का; शिवसेनेचा टोला

मुंबई : Shivsena On Kirit Somaiya | न्यायव्यवस्थेने सत्तेचा माज उतरवला आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग तोडण्याचा तसेच 10 लाख रुपये दंड जमा करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. किरीट सोमय्या जे थर्माकोलचा हातोडा घेऊन गावोगावी जात असतात त्यांना मी खरा हातोडा देत आहे. हा खरा हातोडा घ्या आणि पहिला वार राणेंच्या बंगल्यावर करणार का, असा सवाल मी त्यांना करत आहे, असे ट्विट शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Shivsena MLA Manisha Kayande) यांनी केले आहे. (Shivsena On Kirit Somaiya)

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader And Union Minister Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला. नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील अधीश या बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर आहे. या बंगल्याचा अनधिकृत भाग दुसर्‍यांदा विचारात घेण्यात येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरुन आता भाजपा (BJP) अडचणीत आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनीही या प्रकरणी टीका करताना म्हटले की,
सत्तेच्या अहंकाराला कायदा आणि न्यायव्यवस्थेपुढे नतमस्तक व्हावे लागते. नारायण राणेंच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग दोन आठवड्याच्या आत पाडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निर्णयाचे स्वागत आहे.
कायदा व न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही मोठे नाही. प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे.

या प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुंबईत प्रतिक्रिया देताना मागणी केली की,
नारायण राणे यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे. आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना…माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत.
शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना तुम्ही जितका त्रास द्याल, त्यांना आई जगदंबा कधीही माफ करणार नाही.
ती नक्की बदला घेते आणि आई जगदंबेने नारायण राणेंचा चांगला बदला घेतला आहे.

Web Title :- Shivsena On Kirit Somaiya | mla manisha kayande criticized bjp leader kirit somaiya due to narayan rane adhish bungalow mumbai high court order

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena On Shinde-Fadnavis Govt |शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा, दसरा मेळाव्याला परवानगी दिली नाही तर…

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिका नोकरभरती; 386 जागांसाठी सव्वालाखांहून अधिक उमेंदवारांचे अर्ज ; उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी दिली मुदतवाढ