ED – CBI ला पाकिस्तान आणि चीन सीमेवर जुंपावे,‘सामना’ तून केंद्र सरकारवर पुन्हा निशाना

मुंबई : लडाख आणि काश्मीरतील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाही तरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरुच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकीनीच काम होते असे नाही. दिल्ली सीमेवर आपल्याच शेतकर्‍यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्यांबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही, अशा शब्दात ‘सामना’ मधून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून ईडीच्या कारवाईवरुन सेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

लडाख आणि काश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरुच आहे. तेव्हा या यंत्रणांना चीन आणि पाकिस्तानचीही सुपारी द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कदाचित चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील. बहुधा लडाखमध्ये घुसलेले चीनीही शरण येतील व पाकडेही ‘पीओके’ सोडून पसार होतील. विरोधकांना नमवण्याचे हे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आह. अस एकंदर विद्यमान राज्यकर्त्यांचा समज दिसत आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकीनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकर्‍यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही़ अशा शब्दात शिवसेनेने ‘सामना’ मधून भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.