मला मराठ्यांची गरज नाही ; राणेंनी केला उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना मातोश्रीवर बोलवून त्यांचा अपमान केला. मला मराठ्यांची गरज नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून आता याच मैदानात उद्धव ठाकरे याना गरज आणि गाजर यांच्या मधील फरक दाखवतो असे नितेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

आमदार नितेश राणे नेमके कोणत्या प्रसंगाबद्दल बोलत आहेत हे मात्र अद्याप समजले नाही. परंतु, मराठा समाजाच्या प्रतिनिधींना मातोश्रीवर बोलवून त्यांचा अपमान करण्यात आला असे मला कळले आहे. मला मराठ्यांची गरज नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे मला कळते. आता याच मैदानात गरज आणि गाजरामध्ये फरक दाखवतो असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

राणे आणि ठाकरे या दोन राजकीय घराण्यात सध्या विळ्या भोपळ्याचे वैर सुरु असल्याचे चित्र आहे. कारण नितेश राणे आणि निलेश राणे हे दोन बंधू ठाकरे परिवारावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर मागे एका ट्विट मध्ये निलेश राणे संजय राऊतची यांची अवस्था उद्धव ठाकरे यांनी गल्लीतील कुत्र्या समान करून टाकली आहे असे म्हणले होते.

ह्याही बातम्या वाचा –

हाफीज सईदला पुन्हा झटका ;  ‘जमात’च्या मुख्यालयावर कारवाई

३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जमीनदोस्त’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us