१० कोटी रोजगाराचे लक्ष्य पुर्ण न झाल्याचं ‘खापर’ नेहरू-गांधींवर फोडता येणार नाही : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नॅशनल सॅम्पल सर्वे ने नुकतीच २०१७ – १८ ची बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. मागील ४५ वर्षातला उच्चांकी दर बेरोजगारीने गाठला आहे. ६.१ टक्के हा मागील ४५ वर्षातील सर्वात जास्त आकडा आहे. २०१४ मध्ये सत्तेत येताना २ कोटी रोजगार दरवर्षी देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्या हिशोबाने पाच वर्षांत १० कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते. ते लक्ष्य पार झालेले नाही. तर याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकून जमणार नाही. असे स्पष्ट मत युतीतील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीत युतीला दणदणीत विजय मिळाला. मात्र नुकत्याच बेरोजगारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणाऱ्या अहवालांमधून त्यांची स्थिती समोर आली आहे. त्यावरून युती भक्कम ठेवण्याची ग्वाही देणाऱ्या उध्दव ठाकरेंनी सामनातून सरकारचे कान टोचले आहेत. महागाई,बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला काही सल्ले दिले आहेत. मागील पाच वर्षांत काम देणे हे एकमेव ध्येय आया पुर्ण करणे गरजेचे आहे. केवळ शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटविता येणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही

गेल्या पाच महिन्यांत फक्त मराठवाडय़ातच 315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र व देशाचे चित्र विदारक आहे. शेती जळून गेली व हाताला काम नाही या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनीही नवी आशा घेऊन मोदी यांना मतदान केले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनीही मोदी यांच्या विजयास हातभार लावला आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

Loading...
You might also like