Shivsena Party Chief Uddhav Thackeray | 52 असतील किंवा 152, त्यांची कितीही कुळे आली तरी शिवसेना संपणार नाही;  उद्धव ठाकरेंचा भाजपवर ‘ठाकरी’ भाषेत घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP National President JP Nadda) म्हणाले. काल त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना राज्याचं अध्यक्ष केलं. पण 52 असतील किंवा 152, त्यांची कितीही कुळे आली तरी शिवसेना संपणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी भाजपला ठणकावून सांगितलं. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे (Cartoonist Balasaheb Thackeray) यांनी सुरु केलेल्या मार्मिकचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त (Marmik Vardhapan Din) आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray)  बोलत होते.

 

उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray)  पुढे म्हणाले, नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? गादीवर बसलात म्हणजे हम करे सो कायदा हे चालणार नाही. सध्या लोकशाही (Democracy) जिवंत कशी राहणार, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ पडेल तेव्हा राजसत्तेला व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून फटकारे मारलेच पाहिजेत, असे आवाहन करताना त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला.

 

भाजपने ज्यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नावात किती कुळे आहेत, मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळे उतरली तरी शिवसेना नष्ट होणार नाही. मग ती 52 असतील किंवा 152 असतील. शिवसेना उघड्यावर पडली असं काही जणांना वाटतं. पण शिवसेनेची पाळंमुळं घट्ट आहेत. प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे, ही लोकशाहीला घातक पाऊल आहे. नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हा कसला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव?
आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करुन स्वातंत्र्य मिळालं.
आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) साजरा करतोय,
पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
तुम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहात पण यावेळी तुम्ही लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसला,
असा सवाल त्यांनी केला. तसेच अनेकांना घरावर तिरंगा लावयाचा आहे
पण त्यांच्याकडे घर नाही अशी अवस्था झाली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Shivsena Party Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray criticize bjp chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा