सत्तापेचामुळं शिवसेनेत ‘अस्वस्थता’, ‘प्लॅन बी’ तयार करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेविषयी शरद पवार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल येऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्यापही सत्ता स्थापन झाली नाही. महाशिवआघाडी मिळवून सरकार बनवणार अशी चर्चा सुरु असतानाच सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल संभ्रम वाढवणारं विधान केलं होत. त्यामुळे शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा आणि शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,’ असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे अशी मागणी देखील केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार
राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करेल अशी शिवसेनेला आशा आहे. परंतु, गेल्या 24 तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी दोन विधाने दिली आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. शरद पवार सातत्याने सांगत आहेत की सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा नाही. सरकार स्थापनेबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा. भाजप-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे. आम्ही आमचे राजकारण करु.

पवारांना समजणे सोपे नाही
सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा असं शरद पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की , शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला 100 जन्म लागतील.राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल.

Visit : Policenama.com