शिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – तीन दिवसांपूर्वी शिवेसनेने पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. या मोर्चामधून शिवसेनेने काय साध्य केले हे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. शिवसेनेने पीकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नाशिकमधील येवला येथे आहेत. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खरिप पीक विम्याचे पैसे परत मिळाले नसल्याच्या अधिक तक्रारी शिवसेनेकडे आल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एक्सा या विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र एक्सा विमा कंपनी ही फक्त रब्बी पीक विमा देणार्‍या कंपन्यांमध्ये आहे. त्यामुळे विरोधकांनी या मोर्चावर टीका केली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत या मोर्च्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळू लागले असल्याचे सांगितलं.

ही प्रचारफेरी नाही, सरकारमध्ये असूनही जिथे-जिथे अन्याय होत आहे, तिथे आपण लढलो आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मतदान मिळाले आहे. त्यामुळे मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच ही जन आशीर्वाद यात्रा ही तीर्थ यात्रादेखील आहेत. मी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतोय. मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आशीर्वाद घेतोय. नवा महाराष्ट्र घडवण्याच्या माझ्या विधानानंतर अनेक जण मला विचारत आहेत की, तुमच्याकडे ब्लू प्रिंट आहे का? माझ्याकडे नव्या महाराष्ट्राचे व्हिजन आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

आरोग्यविषय वृत्त –