Shivsena Saamana Editorial On Kirit Somaiya | ‘अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही’ – शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Saamana Editorial On Kirit Somaiya | अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) जुंपलेली पाहायला मिळाली, मात्र आतासुद्धा दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दोन दिवसांमागे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कोकणात (Konkan) गेले होते तिथं राजकीय शिमगा पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana Editorial) अग्रलेखातून सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

 

स्वत:वरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन, मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले होते. म्हणे दापोलीतील (Dapoli) अनधिकृत रिसॉर्ट (Unauthorized Resort) तोडणार आहोत. या महाशयांच्या स्वागताला कोण तर ज्या सोमय्यांनी नारायण राणेंविरोधात (Narayan Rane) 100 बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले आणि ज्यांना तुरुंगात टाका अशी मागणी केली त्यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane), असं म्हणत अग्रलेखातून शिवसेनेने सोमय्यांवर टीका केली आहे.

 

हा एक मानसिक घोटाळाच आहे, अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही,
अशा शब्दात सोमय्यांवर शिवसेनेने अग्रलेखात टीका केली आहे.
त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) निशाणा साधला.

दरम्यान, राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले,
पण महाराष्ट्राची इज्जत आणि गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वत:च करीत आहेत आणि चुलीची शेकोटी घेत बसले आहेत,
असं म्हणत फडणवीसांवरही शिवसेनेने निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Shivsena Saamana Editorial On Kirit Somaiya | why maharashtra hatred is your good governance shivsena saamana editorial on kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा