स्वबळावरून शिसवेनेचा कॉंग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घ्या’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष कॉंग्रेसवर (Congress) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे, असा सल्लावजा टोला सेनेने (Shivsena) कॉंग्रेसला लगावला आहे.
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे, तरीही स्वबळाची भाषा करतोय. इतर सगळे स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का? असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भाषणाचा दाखला देत काँग्रेसला सल्ला दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Congress leader MP Rahul Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात कॉग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाची गर्जना केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे देखील स्वबळाची भाषा करत असतात. त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाली.
या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही.
मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होती त्यावेळी शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेला होता.
स्वबळाचे दांडपट्टे त्यावेळीही फिरवले होते. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही.
फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घ्यावी, असा सल्ला शिवेसेनेने दिला आहे.

राममंदिर ट्रस्टचा जमीन घोटाळा आणि हिंदुत्व यांचा परस्परही कसा काय संबंध असू शकतो?
अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी जो तीर्थक्षेत्र न्यास निर्माण झाला त्यांना रामाच्या नावावर जमीन घोटाळा करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही सेनेने उपस्थित केला आहे.
राममंदिर जमीन घोटाळय़ावर प्रश्न विचारल्याने भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनावर फुटकळ मोर्चा आणला अन् शिवसैनिकांच्या तावडीत ते सापडले व जे व्हायचे तेच घडले.
या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून सत्कार केला. भाजपला ते रुचले नाही व त्यांच्या पोटात दूखू लागले आहे.
त्यांच्या पोटदुखीवरही औषध देऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात ते महत्वाचे आहे. बाबरी आम्ही तोडली नाही, असे काखा वर करून सांगणा-यांची परंपरा शिवसेनेची नाही, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : shivsena samana editorial on cm uddav thackery speech and
congress as well as ayodhya ram mandir land scam

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट