शिवसेनेच्या आमदाराची भाजपा आमदाराला धमकी, म्हणाले – ‘तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर…’

बुलढाणाः पोलीसनामा ऑनलाइन – मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते असे, धक्कादायक विधान करणा-या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. भाजपचे संजय कुटेसारखे तीनपाट आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे.

माझा पुतळा काय जाळतो. तुझ्या मायने दूध पाजल असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय चीज आहे ते दाखवतो, अशी धमकी आमदार गायकवाड यांनी दिली आहे. माझ्याविरोधात तक्रार काय देता ? मीच तुमच्याविरोधात तक्रार करतो. राज्यातील लोक मरत असताना तुम्ही आंदोलन करताय. लोक मरत आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहात असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे की, राज्यात मुख्यमंत्री आपला नाही म्हणून केंद्राकडून रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी अडवणूक केली जात आहे. मी फक्त यावर वस्तूस्थिती मांडली तर माझा पुतळा जाळला गेला. माझा यात दोष काय ? देशातील सर्व लोक एकाच पक्षाचे आहेत का ? राज्यातील जनतेला मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान गायकवाड यांची रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लोज घालावेत अन् चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.