मुख्यमंत्र्यांसह ‘संजय भाऊ I am Sorry’ फ्लेक्सचं ‘हे’ आहे ‘सत्य’, जाणून घ्या

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचा निकाल लागून 14 दिवस उलटले असताना देखील अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निकालानंतर अनेकवेळा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा केला आहे. त्यातच पिंपळे सौदागर येथील शिवार चौकामध्ये एक फलक लागल्याची चर्चा होती. शिवार चौकामध्ये ‘संजय भाऊ I AM SORRY’ चे झळकलेले फलक बनावट असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

शिवार चौकात फलक लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप नेत्याने तसे लेखी पत्र वाकड पोलिसांना दिले आहे. मात्र, पाहणीमध्ये अशा प्रकारचे फलक लागले नसून कोणीतरी खोडसाळपाणा केला आहे. राजकीय वर्तुळाच चर्चा व्हावी यासाठीच हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. भाजपच्या एका नेत्याने ‘संजय भाऊ I AM SORRY’ असा मेसेज लिहून त्यापुढे मुख्यमंत्र्याचा फोटो लावून तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला होता. मात्र, असे पोस्टर लावण्यात आले नसल्याचे शिवरा चौकातील नागरिकांनी सांगितले.

काही महिन्यापूर्वी पिंपरीतील पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून ‘shivade i am sorry’ असे फलक लागले होते. ही बॅनरबाजी शहरात चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणात पुण्यातील प्रियकरावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. शिवार चौकामध्ये ‘संजय भाऊ I AM SORRY’ फलक लागल्याने ‘SORRY’ चे फलक लागल्याचे व्हायरल झाले. त्यानंतर पडताळणीमध्ये अशा प्रकारचे कोणतेही फलक लागले नसल्याचे समोर आले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके