Video : ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते’ : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची मुलाखत घेतली असून त्यात पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. मुलाखतीचे प्रोमो राऊत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. त्यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी पवारांनी‘सत्ता ही विनयाने वापरायची असते,असे उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे. तर भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही, असे शरद पवार बोलत असल्याचे दिसत आहे. राज्यात सत्ताकेंद्र एकच असले पाहिजे असेही पवारांनी सांगितले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचं बोलले गेले आहे. पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार चालवत विरोधकांनी म्हटले आहे. पवारांची नेमकी भूमिका किंवा काय मत आहे याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.