भाजपा आणि शिवसेनेचे नाते आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखे, संजय राऊतांनी केलं स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होणार अशी चर्चा काही दिवसापासून सुरु आहे, त्यातच भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) याची भेट झाली त्यामध्ये एक तास चर्चा झाल्याच्या चर्चा शनिवारी सुरु असताना रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान करीत राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय होतात आणि जर-तरला कोणताही अर्थ नसतो, असं म्हंटल. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं (Divorce of Aamir Khan and Kiran Rao) उदाहरण देत राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते. भाजपासोबत मतभेद आहेत, मात्र मैत्री कायम आहे असं स्पष्ट केलं.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

राऊत म्हणाले की शिवसेनेसोबत शत्रुत्व नसल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे. मी देखील हेच सांगतोय. मतभेद नक्कीच आहेत. आम्ही काय भारत पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले असून फडणवीसांनी हेच सांगितलं आहे. यासाठी ताजे उदाहरण दयायचे झाले तर आमीर खान आणि किरण राव यांचच पहा. दोघांचे रस्ते वेगळे झाले मात्र मैत्री कायम आहे. तसेच आमचं आहे. मैत्री कायम आहे पण मार्ग बदलले आहेत. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही अशी त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परिस्थिती आता काय आहे आणि भविष्यात काय असेल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्रातील सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे. आणि आम्ही जे सरकार बनवले ते उत्तम चालू आहे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. असे सांगत शिवसेनेनं कधीही पत्र लिहिण्याचे धंदे केले नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांना लगावला.

देशात लोकशाही आहे त्यामुळे इथे हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. सर्वांचा डीएनए एकच असून भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये तसेच झुंडबळीच्या गुन्ह्यत सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh) यांनी म्हंटले होते त्यावर बोलताना संजय राऊत यांनी आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Title : shivsena sanjay raut on bjp devendra fadanvis amir khan kiran rao divorce

 

हे देखील वाचा

Woman Care | ‘हे’ ६ पौष्टिक घटक महिलांना अनेक आजारांपासून रक्षण देतात, जाणून घ्या

Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

Cesarean Delivery | ‘सिझेरियन’नंतर महिलांचा आहार कोणता असावा? जाणून घ्या काय खावे आणि काय नाही