‘ब्लॅकमेलिंग’ चालणार नाही, अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद हवंच, महत्वाचे ‘हे’ 30 ‘वाक्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक म्हणूनच मुख्यमंत्री होतील. त्यानंतर आता शिवसेनेकडून मुनगंटीवारांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेने कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही असे म्हणत मुख्यमंत्री पदावर आम्ही अजूनही ठाम असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सिद्ध करावे आणि नसेल तर तसे मान्य करावे असे आव्हान राऊत यांनी भाजपला पत्रकार परिषदेद्वारे दिले आहे. तसेच शिवसेना कधीही युतीबाबत खोटे बोललेली नाही असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये

1) जनतेला शिवसेनेला फसवणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे.

2) 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये फरक आहे.

3) उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली आहे की राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार.

4) देवेंद्र फडणवीस हे जर भाजपचे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी 145 ने बहुमत दाखवून शपथ घ्यावी.

5) भाजपला विचारा की ते त्यांच्या भूमिकेवर ठाम का नाही आहेत.

6) राज्यात अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होतेय ते राज्याचं नुकसान करत आहेत.

7) चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटले. त्यावेळी सरकार स्थापनेचा दावा का केला नाही.

8) उद्धव ठाकरे हे कायम त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

9) सत्ता गेली की सारा माज निघून जातो.

10) शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार.

11) शिवसैनिक खोटं बोलत नाही आणि शिवसैनिक दिलेला शब्द पाळतो.

12) आम्ही आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलेलं नाही.

13) सरकार स्थापन करण्यासाठी भाजप असमर्थ झाल्यास शिवसेना पुढाकार घेणार

14) संविधानात राहून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू

15) अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री यावर युती झाली आहे

16) उद्धव ठाकरे जे ठरवतील ते करू हे सगळ्या आमदारांना मान्य आहे.

17) सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

18) 8 तारखेपर्यंत विधानसभेची तारीख आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे पण सत्ता स्थापन करेनात.

19) भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे तर राज्यपालांकडून रिकाम्या हाती का परत आले.

20) सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचं संख्याबळ तयार जर भाजपकडे असेल तर 2 दिवसांत राज्यपालांकडे जावं.

21) शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत.

22) मुख्यमंत्री भाजपचा होणार हे वारंवार भाजपचे नेते म्हणतात पण त्यांच्याकडे बहुमत नाही.

23) सरकार मिळावं, या राज्याला ताकद देण्याचं काम शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल.

24) दडपशाही आणि गुंडगिरी आता चालणार नाही.

25) भाजपने जाहीर करावं की आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थ आहोत. त्यानंतर शिवसेना पाऊलं उचलेन.

26) शिवसैनिक खोटं बोलून सत्तेत येत नाही त्यामुळे भाजपनेही तसं राहावं.

27) युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, दुसरा पर्याय मी निवडणार नाही उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट.

28) यापुढे राज्याचं नेतृत्त्व हे शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल.

29) भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही.

30) माझ्यावर कोणी नाराज असेल तर तो माझा सन्मान आहे.

31) भाजपचे खेळ आता जूने झालेत. जर बहुमत असेल तर सिद्ध करावं नसेल तर समोर येऊन सांगावं.

32) भाजपने दोन दिवसांत 145 आमदारांची यादी दाखवावी.

33) आता आमची संयमाची भूमिका आहे.

34) भाजपला बहुमत मिळेनासे झाले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

You might also like