‘लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ‘या’ बड्या नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा फॉर्म्युला ठरला असून त्यानुसारच सत्तेत वाटा मिळावा अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. तसेच भाजपने आम्हाला जागा न दिल्यास आम्ही बहुमत स्पष्ट करून मुख्यमंत्री आमचाच असेल असेदेखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पवारांच्या भेटीवर खुलासा
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भेटीवर देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांची भेट कोणत्याही राजकीय कारणासाठी घेतली नसून सामान्य आणि नियमित भेट होती असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे मोठे नेते असून हा नेहमी त्यांची भेट घेतो असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com