Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

मुंबई : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना शिंदे यांनी योग्य संरक्षण दिले पाहिजे. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या (BJP) दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) नेते खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी सध्या व्हायरल होत असलेल्या महायुतीच्या (Mahayuti) कथित फॉर्म्युलावर व्यक्त केली आहे.

राज्यात महायुतीचा लोकसभेसाठी (Lok Sabha Election) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून ३२-१२-४ असा हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. भाजपाला ३२, शिवसेनेच्या शिंदे गटाला १२ आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जाणार आहेत. हा कथित फॉर्म्युला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर किर्तीकर यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.(Shivsena Shinde Group)

खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची अवस्था नाही. त्यांनी १२ जागा दिल्यात की नाही तेदेखील आम्हाला माहिती नाही. भाजपाने १२ जागा दिल्या म्हणजे उपकार केले का? भाजपाने हे चर्चा करून ठरवावे. आमच्या बाजूने कोण चर्चा करत आहे हे देखील माहिती नाही. आम्ही आमच्या जागांवर ठाम असायला पाहिजे.

गजानन कीर्तिकर म्हणाले, हा जो फॉर्म्युला आहे, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. ३२-१२-४ हे आकडे दिसत आहेत, याला काही आधार नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्यासह आमच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. १२ जागांबाबतचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.

गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले, २०१९ च्या लोकसभेचा विचार करता आमचा २२ जागांवर दावा आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपा २६ जागांवर लढली. त्यांचे ३ उमेदवार पराभूत झाले आणि २३ जागा जिंकल्या.
तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे ४ उमेदवार पडले आणि १८ जागा जिंकल्या.
तसेच राज्यात विरोधी पक्षांचे ७ उमेदवार जिंकले.

कीर्तिकर म्हणाले, राज्यातील शिवसेनेची ताकद आणि एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहता २०१९ प्रमाणेच जागावाटप
व्हायला हवे. परंतु, आता आमच्या सरकारमध्ये नवीन सहकारी आलेत.
या नवीन सहकाऱ्याला म्हणजेच अजित पवार गटाला भाजपा आणि शिवसेनेने आपल्याकडच्या काही जागा द्यायला हव्यात.

कीर्तिकर म्हणाले, बरोबर आलेल्या १३ खासदारांचे राजकीय भवितव्य टिकवणे, त्यांना राजकीय स्थिरता देणे हे शिंदे
यांचे कर्तव्य आहे. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत. परंतु, आम्हाला १२ जागा मान्य नाहीत.
भाजपा आम्हाला इतक्या जागा देणार आणि आम्ही त्या घेणार असे नाही. मागच्या वेळी आमचे १८ खासदार आले होते.
त्यामुळे आम्हाला किमान १८ जागा हव्यात. हवे तर उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Yugendra Pawar | अजितदादांच्या विरोधात सख्खा पुतण्या मैदानात, युगेंद्र पवार म्हणाले, ”पवार साहेब म्हणतील तसं…”

Manoj Jarange Patil | भुजबळांचा खबऱ्या जरांगेंच्या गोटात? मनोज जरांगेंनीच दिली माहिती, म्हणाले ”हा घातपाताचा प्रकार…”

Solapur Rural Police | एमडी ड्रग्स प्रकरणातील आंतर राज्य टोळीचा मुख्य सूत्रधार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन