Shivsena | शिवसेना यूपीएत सहभागी होणार? संजय राऊत घेणार राहुल-प्रियंका यांची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून (NDA) बाहेर पडल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कोणत्याच आघाडीचा घटक नसलेला शिवसेना (Shivsena) हा पक्ष लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shivsena) संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेनेने आपले मन बनवले असून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

 

संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची यूपीएबाबत नेमकी भूमका काय आहे, हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगणार असल्याचे बोलले जात आहे. ही बैठक सकारात्मक झाल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणात (national politics) मोठी घडामोड पाहायला मिळू शकते असे राजकीय जाणाकारांचे मत आहे.

 

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी उभारण्याचा काही पक्षांचा प्रयत्न असला तरी शिवसेनेचे (Shivsena) मात्र यावर वेगळे मत आहे. भाजपला (BJP) आव्हान द्यायचं असेल तर काँग्रेसला वगळून राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आघाडी प्रभावी ठरु शकत नाही. तिसरी, चौथी, पाचवी अशा कितीही आघाड्या उभ्या राहिल्या तर त्याचा भाजपला होईल असे संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत हे उद्या (मंगळवार) राहुल गांधी यांची तर बुधवारी प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.
या भेटीत राऊत हे युपीएबाबतची शिवसेनेची भूमिका त्या दोघांसमोर मांडणार आहेत, असे सांगितले जात आहे.
याबाबत काँग्रेस व शिवसेनेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
देशात 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच्या या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत.
त्यामुळे या निवडणुकांपूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील होण्याचा विचार शिवसेनेच्या गोटात सुरु आहे.
यामागे शिवसेनेची अनेक राजकीय गणिते असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title :- Shivsena | shiv sena will soon join upa sanjay raut will meet rahul and priyanka gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Banks Strike | खासगीकरणाविरोधात 2 दिवसांचा संप करणार बँक कर्मचारी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी तारीख तपासा