Shivsena Shivsampark Abhiyan | महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय कुरघोडी, शिवसेनेच्या 2 खासदारांची नाराजी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Shivsampark Abhiyan | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आकाराला येताना काही सूत्र ठरले होते. परंतु सातारा जिल्ह्यात (Satara District) ते पाळले जात नाही. राष्ट्रवादीचे  (NCP) पालकमंत्री शिवसेनेला दाबण्याचे काम करत आहे, ही बाब चुकीची आहे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनीच करायला पाहिजे असे मत खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी व्यक्त केले. शिवसंपर्क अभियान निमित्त (Shivsena Shiv Sampark Abhiyan) सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर असून ते कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

शिवसंपर्क अभियानानिमित्त (Shivsena Shivsampark Abhiyan) सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानगुडे – पाटील (Nitin Bangude – Patil), माजी जिल्हा प्रमुख हर्षद कदम (Harshad Kadam), नितीन काशिद (Nitin Kashid), शशिराज करपे (Shashiraj Karpe), शशिकांत हापसे (Shashikant Hapse) यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

 

खासदार शिंदे म्हणाले, ज्या – ज्या ठिकाणी राष्ट्रवादी सक्षम आहे. त्या – त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान निधी वाटपाबाबत होत असलेल्या  दुटप्पीपणा निदर्शनास आला असून, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.

यावेळी विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी निधी वाटपात अन्याय होत असल्याचे सांगितले. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये पदांप्रमाणे निधी वाटपामध्येही समसमान वाटप होणे अपेक्षित होते. परंतु, तसे होत नाही. ही बाब योग्य नसून या संपर्क दौऱ्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना (Local Body Elections) ब्रेक लागला आहे.
याबाबत राजकारण केले जात आहे.
मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही शिवसेनेचीही भूमिका असून डेटा कलेक्ट करण्याचे काम सुरु आहे.

 

खा. संजय जाधव यांचीही नाराजी
पुण्यातही शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव (Parbhani MP Sanjay Jadhav) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे प्रक्षप्रमुख मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना हवं तसं पाठबळ मिळत नाही.
निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय केला जातो. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व ती मदत पुरवली जाते.
मात्र, शिवसैनिकांना डावललं जात आहे. आमचा मित्रपक्ष आमची ठोकतोय, असं जाधव यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Shivsena Shivsampark Abhiyan | ncp does not give funds to shiv sena mp shrikant shinde sanjay jadhav displeased

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा