Shivsena | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते…काँग्रेस नेत्याची दिल्लीत भेटही घेतली होती पण…, शिवसेनेने शिंदेंचे हिंदुत्व ठरवले खोटे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून शिंदे यांचे सोयीचे राजकारण सांगताना अनेक पुरावे मांडण्यात आले आहेत. सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीवर (NCP) एकनाथ शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्याशी संधान बांधले होते. तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. बोलणी फिसकटली, असा गौप्यस्फोट ‘रोखठोक’मधून (Shivsena) करण्यात आला आहे.

 

शिवसेनेत उभी फूट पाडून जोरदार धक्का देणारे एकनाथ शिंदे हे आपण भाजपासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) विचार कसा पुढे नेत आहोत, आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जवळीक साधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बाळासाहेबांच्या विचारांना कशी तिलांजली देत आहेत, हे वारंवार सांगत असतात. परंतु शिंदेंच्या या सोयीच्या राजकारणाचा बुरखा आज सामनाच्या रोखठोकमधून फाडण्यात आला आहे.

 

रोखठोकमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते.

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती, असे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

 

रोखठोकमध्ये म्हटले आहे की, आनंद दिघे (Anand Dighe) यांना ‘टाडा’तून जामीन मिळावा यासाठी त्यांच्या काँग्रेसमधील चाहत्यांनी प्रयत्न केले.
एके दिवशी पहाटे 4 वाजता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली.
काही सूचना दिल्या व दिघे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.
‘वर्षा’वर तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) होते. तेही काँग्रेसचे! दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधी सार्वजनिक ठिकाणी,
मोकळ्या मैदानात व्हावेत व तेथेच त्यांचे स्मारक व्हावे यासाठी पुढाकार घेणारे
प्रभाकर हेगडे हे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष होते. भाजप या काळात कुठेच नव्हता.

 

Web Title :- Shivsena | shivsena alligation on cm eknath shinde for join congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Electric Scooter Battery Blast In Mumbai | धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क