Shivsena | आता निवडणूक आयोगात लढू…, शिवसेनेची पक्षचिन्हाबाबत पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वादावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर सुनावणी झाली. घटनापीठाने आज पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा (Election Commission) असल्याचे स्पष्ट केले. याबाबत निवडणूक आयोगाची कार्यवाही रोखण्याची शिवसेनेची मागणी न्यायालयाने फेटाळली. या निर्णयावर शिवसेनेकडून (Shivsena) प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी आता निवडणूक आयोगात लढू, असे म्हटले आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

खासदार सावंत म्हणाले, प्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय घ्यायचा की निवडणूक आयोगाचा मुद्दा घ्यायचा हा प्रश्न न्यायालयासमोर होता. आमचे म्हणणे प्रथम अपात्रतेचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मुद्द्याकडे जाता येईल. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या दोन वेगळ्या प्रक्रिया आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला यावर निर्णयाचा अधिकार दिला आहे. (Shivsena)

 

अधिक माहिती देताना खासदार सावंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले युक्तिवाद लाईव्ह दाखवण्यात आले. त्यामुळे देशाला आणि जगाला हा युक्तिवाद पाहता आला. कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक मुद्दे मांडले. ते ऐकल्यानंतर न्यायालयाने पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे जाण्याचे निर्देश दिले. आता निवडणूक आयोगात लढू.

 

सावंत म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरूच राहील.
हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न नाही. संपूर्ण देशाने न्यायालयातील युक्तिवाद ऐकलेत.
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो.

 

Web Title :- Shivsena | shivsena mp arvind sawant first reaction on supreme court decision on party symbol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली