Shivsena | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची खेळी, नाराजी दूर करण्यासाठी 3 शहरप्रमुख तर 2 महानगरप्रमुख

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Municipal Election) तोंडावर शिवसैनिकांमधील (Shivsena) नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत (Nagpur Shivsena) मोठे बदल करण्यात आले आहेत. आधीच्या प्रमुखांना कायम ठेवत जोडीला एक अतिरिक्त महानगर तर एक शहर प्रमुख (City Chief) अशा दोन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तीन शहर तर दोन महानगर प्रमुख झाले आहेत. राज्याच्या उपराजधानीवर लक्ष केंद्रित करताना असंतुष्ट गटालाही यातून संधी देण्यात आली आहे.

 

शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे मुखपत्रातून नवी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांना (Shivsena) सोमवारी याबाबत समजले. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशावरुन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तात्पुरत्या नियुक्त्या (Temporary Appointments) केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या आधारे त्यांना कायम करण्यात येईल, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

 

शहरासाठी दोन प्रमुख नियुक्त करण्याची मागणी फार जुनी आहे. यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले. महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे (Pramod Manmode) यांच्यासोबत दक्षिण नागपुरातील (South Nagpur) किशोर कुमेरिया (Kishore Kumeria) यांना प्रमुख केल्याने पदाधिकाऱ्यांना तीन – तीन विधानसभा मतदारसंघाची (Assembly Constituency) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मानमोडे यांच्याकडे दक्षिण – पश्चिम, मध्य व पश्चिम नागपूर तर कुमेरिया यांच्याकडे पूर्व, उत्तर व दक्षिण नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

शिवसेनेने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत तीन सहसंपर्क प्रमुख होते.
सतीश हरडे (Satish Harde) यांनी पदाचा राजीनामा (Resignation) दिला तर शेखर सावरबांधे (Shekhar Savarbandhe) यांनी सेनेला जय महाराष्ट्र करुन राष्टवादीत (NCP) प्रवेश केला.
किशोर कुमेरिया यांनी अघोषित बहिष्कार टाकल्याप्रमाणे स्थिती होती.
संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी (MLA Dushyant Chaturvedi) यांच्यासोबत आता सहसंपर्कप्रमुखपदी मंगेश काशीकर (Mangesh Kashikar) हे राहतील.
त्यांना संघटकपदावरुन बढती देण्यात आली आहे.
त्यांच्याकडे पश्चिम, दक्षिण – पश्चिम आणि दक्षिण नागपूरची जबाबदारी आहे.
शहर संघटक विशाल बरवटे (Vishal Barvate) यांच्याकडे दक्षिण, पूर्व आणि उत्तर तर किशोर पराते (Kishor Parate) यांच्याकडे दक्षिण – पश्चिम, मध्य व पश्चिम नागपूर आहे.

शहरात पूर्वी दोन प्रमुख होते आता तीन झाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी स्वगृही परतलेले प्रवीण बरडे यांना शहरप्रमुख करुन पूर्व व मध्य नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.
आधीचे शहरप्रमुख नितीन तिवारी (Nitin Tiwari) आणि दीपक कापसे (Deepak Kapase) यांचा प्रत्येकी एक मतदारसंघ कमी झाला आहे.
तिवारी यांच्याकडे पश्चिम व उत्तर तर कापसे यांच्याकडे दक्षिण व दक्षिण – पश्चिम नागपूर आहे.
कुमेरिया यांना पक्षाने संधी दिल्याने असंतुष्ट गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे बरडे यांच्याकडे शहर प्रमुखपद आल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे.
बसपतून आलेल्या सुरेश साखऱे (Suresh Sakhre) यांना एका मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :-  Shivsena | shivsena reshuffle ahead of Municipal elections in nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा