Shivsena | शिवसेनेने केले एकनाथ शिंदेंच्या दाव्याचे पोस्टमार्टेम, काँग्रेसच्या साथीने आनंद दिघेंनी ठाण्यात भाजपला दूर केल्याचा सांगितला किस्सा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या हिंदुत्वाचा विचार आपण कसे पुढे नेत आहोत, असे भासवत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसे हिंदुत्ववादी नाहीत, त्यांची काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीशी (NCP) सलगी आहे, हे वारंवार सांगत आहेत. शिंदेंच्या या दाव्याचे पोस्टमार्टेम सामनातील रोखठोक सदरातून करण्यात आले आहे. यासाठी ठाण्यात काँग्रेसच्या मदतीने आनंद दिघेंनी भाजपाच्या (BJP) खासदाराला कसे पराभूत केले, आणि कल्याण सिंगाना एकमेव हिंदुहृदयसम्राट नेता म्हणणार्‍या राम कापसे (Ram Kapse) यांना कसा धडा शिकवला, याचा किस्सा या लेखात सांगण्यात आला आहे. (Shivsena)

 

भाजपाच्या ठाण्यातील खासदाराला आनंद दिघे यांनी कसा धडा शिकवला तो किस्सा रोखठोकमध्ये नमूद करताना म्हटले आहे की, अनेक वर्षे ठाण्यातील राजकारण हे आनंद दिघे व वसंत डावखरे या जोडगोळीच्या युतीने केले. दोघांचे संगनमत व मैत्री होती. डावखरे काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादीचे झाले. भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत. आता दिघे किती भाजपप्रेमी होते त्याचा एक प्रसंग सांगतात. कदाचित शिंदे व त्यांच्या 40 आमदारांना तो माहीत नसावा. (Shivsena)

 

1992 साली अयोध्येत बाबरी पडली. भाजपने जबाबदारी झटकली. बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक (Shiv Sainik) असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समस्त देशाचे हिंदुहृदयसम्राट बनले. देशात हिंदुत्वाची तुफान लाट त्यातून आली व शिवसेनाप्रमुख त्या लाटेचे नेतृत्व करू लागले. उत्तर प्रदेशात कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त केल्याने कल्याण सिंगांच्या कपाळावर हौतात्म्याचा टिळा लागला होता.

तेव्हा ठाणे हा कल्याण-डोंबिवलीसह एकच लोकसभा मतदारसंघ होता व भाजपचे राम कापसे हे शिवसेना-भाजप युतीचे (Shivsena-BJP alliance) उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्याआधी कापसे हे कल्याण विधानसभा मतदारसंघातून (Kalyan Assembly Constituency) आमदार म्हणून निवडून येत असत. तर या कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग (Former Chief Minister Kalyan Singh) यांना सभेस बोलावून त्यांचा वीरोचित सत्कार करण्याचे ठरवले.

 

ही सभा म्हणजे ठाण्यातील शिवसेनेस अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा पहिला प्रयोग होता. आनंद दिघे यांना हे पटले नाही. त्यांनी सभेत मोडता घातला नाही, पण संध्याकाळी ते सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून सभा ऐकायला गेले. त्यांचे खास लोक गाडीत बसले होते. सभा सुरू होताच खासदार राम कापसे भाषणास उभे राहिले.

 

भाषणात त्यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा करताच दिघे अस्वस्थ झाले.
त्यांचा चेहरा लालबुंद झाला. ”अरे, कापसे हे काय बोलताहेत? हिंदुहृदयसम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे आहेत.
भाजप नवे हिंदुहृदयसम्राट का निर्माण करतोय? हे शिवसेनेला आव्हान आहे. ठाण्यात तरी मी चालू देणार नाही.
मी आता सांगतो, इकडची दुनिया तिकडे होईल, पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल!”

 

आनंद दिघे त्या गाडीतच जाहीर करून बसले. ही खदखद त्यांनी मनातच ठेवली,
पण लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटपात ठाण्याचा विषय येताच दिघे
यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा (Shivsena) दावा सांगितला.
ठाण्यात भाजप चालणार नाही. दिघे बाळासाहेबांना भेटले व त्यांनी आग्रह केला.
”राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत. शिवसेना प्रेमी जनता त्यांचा पराभव करेल. ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल.”

शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन (Pramod Mahajan), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दिघे ठाम होते.
अखेर त्यांच्या हट्टापुढे सगळ्यांना मागे हटावे लागले.
कापसे यांना मागे ठेवून ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha Constituency) शिवसेनेकडे आला
व महापौर निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे (Prakash Paranjape) हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले.
भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनाद्वेषाला आव्हान देणार्‍या दिघ्यांचे हे खरे रूप होते, पण शिंदेनिर्मित चित्रपटात ते कोठेच दिसले नाही!

 

Web Title :- Shivsena | shivsena reveals how anand dighe keep away bjp by taking help of congress also slams eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप