Shivsena | दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने फोडला फटाका, शिंदे सरकारला इशारा देत म्हटले…तर खुर्चीखाली धमाका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी (Diwali) कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस (Gas) व पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या संपादकीयमधून दिला आहे.

 

शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कितीही संकटे येवोत, जीवन-मरणाचे प्रश्न उभे राहोत, पण मुळातच उत्सवप्रिय असलेला आपला समाज सणवार आले की, या अडीअडचणी व संकटांना तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून सणाच्या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. यंदाचा दिवाळीचा सणही सालाबादप्रमाणे हर्षोल्हासात साजरा होत असला तरी या आनंदोत्सवालाही चिंतेची आणि काळजीची एक किनार आहेच. राज्यातील महानगरे व मोठ्या शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे.

पगाराची निश्चित रक्कम मिळणारा चाकरमानी वर्ग, सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीला असलेल्या मंडळींना दिवाळीनिमित्ताने मिळणारा बोनस आणि निश्चित उत्पन्नामुळे कर्ज देण्यास तत्पर असलेल्या बँका यामुळे दिवाळीच्या काळात सर्वत्र खरेदीचा माहौल दिसत असला तरी पगार, बोनस मिळत नसलेल्या गरीब शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणार्‍या मंडळींच्या नशिबी मात्र खरेदीची ही चंगळ नसते.

 

त्यातूनही असेल तेवढ्या उत्पन्नातून चार पैसे वाचवून मुलाबाळांसाठी फटाक्यांची खरेदी, थोडेफार गोडधोड करून दिवाळीचे स्वागत करण्याचा प्रयत्न जो तो करीत असतो. याचा अर्थ लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये.

 

शिवसेनेने म्हटले आहे की, रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतकर्‍यांवर जे ओल्या दुष्काळाचे (Rain in Maharashtra) संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकर्‍यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा.

यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकर्‍यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकर्‍यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे.

 

सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही.
त्यामुळे सत्ताधार्‍यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? हा प्रश्न कायमच आहे.
महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदीचे सावट, बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि
अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे.

 

ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून आणि हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची
नुकसानभरपाई देऊन सरकारने शेतकर्‍यांच्या आयुष्यात प्रकाशकिरणांची थोडीशी तरी तिरीप टाकायलाच हवी.
अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल,
अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे .

 

Web Title :- Shivsena | shivsena saamana editorial diwali maharashtra government farmers drought

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा