Shivsena | … तर ते भांगेच्या नशेतील स्वप्न पाहतायत, संजय राऊतांच्या अटकेनंतर सामनातून विरोधकांवर प्रहार

Shivsena shivsena saamana editorial targets ed and government over sanjay raut arrest maharashtra politics
File Photo
ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) 4 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत (ED Custody) असलेले शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी कोठडीत चौकशी (Ed Inquiry) होणार आहे. संजय राऊत यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होणार आहे. अशातच शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून राऊतांची ईडी चौकशी, त्यांना झालेली अटक (Arrest) आणि एकंदरित सगळ्या प्रकरणावर सामनातून टीका करण्यात आली आहे. ‘भांगेच्या नशेतले स्वप्न !’ या मथळ्याखाली सामनामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अग्रलेखात (Saamana Editorial) विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

 

‘शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आणि शिवसेना (Shivsena) लढत राहील !’ असं म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच ‘महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरु आहेत’, असं म्हणत विरोधकांवर संपादकीयमधून जोरदार निशाणा साधला आहे.

 

तसेच महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल ? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

 

राजकारण खालच्या पातळीवर …

महाराष्ट्राचे व देशाचे एकंदरीत राजकारण (Politics) खालच्या पातळीवर नेऊन ठेवले गेलेच होते. पण ते आता किती नीच पातळीवर पोहोचले आहे ते दिसू लागले आहे. शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक करताच शिंदे गटातील आमदारांनी (Shinde Group MLA) आनंद व्यक्त केला तर भाजपच्या (BJP) लोकांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तर कमाल केली ‘कर नाही त्याला डर कशाला’ असे साळसूदपणे सांगून त्यांनी वेळ मारुन नेली. ईडीला घाबरून पळ कोणी काढला व दिल्लीत जाऊन कसे कोण शरणागत झाले हे देशाने पाहिले असल्याचे त्यांनी म्हटलेय.

 

अनेक खोटे पुरावे उभे केले

संजय राऊत यांच्यावरील कारवाई आकसाने, राजकीय सूडापोटीच करण्यात आली आहे. त्यांना गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणाचे सूत्रधार ठरवण्यासाठी अनेक खोटे पुरावे उभे केले गेले. त्यांच्या घरावर धाड टाकली. मुळात कायदा व नियम या देशात राहिलाच नव्हता, पण आता राज्यघटना, लोकशाही वगैरे शब्दांचेही रोज हत्याकांड होत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

 

Web Title : –  Shivsena | shivsena saamana editorial targets ed and government over sanjay raut arrest maharashtra politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts