Shivsena | बुडणारे पुणे! स्मार्ट सिटीचा ‘पाण’ उतारा!, पुण्याला पावसाने शिवसेनेने भाजपला झोडपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | पुणे (Pune) तेथे काय उणे, असे नेहमीच अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांची पावसाने (Rain in Pune) मात्र त्रेधा तिरपिट उडवली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि पर्यायाने सत्ता असलेल्या भाजप (BJP) पक्षावर देखील. शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र ‘सामाना’तून या पुण्याच्या प्रलयाचा स्वच्छ शब्दांत आढाव घेतला गेला आहे.

 

सोमवारी (दि. 17) पुण्यनगरीत दोन तासांत सुमारे 125 मीमी पावसाची नोंद झाली आहे. आयटी राजधानी (IT capital), ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट (Oxford of the East), विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतीक राजधानी (Cultural Capital) अशी कौतुक मिश्रित बिरुदे मिरविणाऱ्या पुण्याची पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय कि पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या विनोदाने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीवर टांगली. पुणे तिथे काय उणे, असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या स्मार्ट सिटीचा (Pune Smart City) एवढा पाण उतारा यापूर्वी कधी झाला नव्हता. तो महापालिकेला न विचारता पाडलेल्या पावसाने केला नाही. तो बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, असे सामनाच्या (Saamana Editorial) अग्रलेखातून छापून आले आहे.

 

एरवी मुंबई महापालिकेला (BMC) हिणविणारे आणि शिवसेनेकडे (Shivsena) बोट दाखविणारेच पुण्याच्या महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निर्सगावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखी पाऊस अशा केविलवाण्या पळवाटा ते काढत आहेत. पुण्यातील तथाकथित विकास कामांचे रस्त्या रस्त्यांवर जलार्पण झाले. भाजपने पुण्यातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले पण स्मार्ट सिटी तर दूरच, पावसाने पुण्याचे कसे वाटोळे झाले हे पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्याचा वाहतूक कोंडीने (Pune Traffic Jam) आधीच श्वास कोंडत आहे. पुण्यात पाच ते सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे पुण्यासारखा विकास कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असे देखील अग्रलेखात म्हंटले आहे.

भाजपकडून शहरातील मूळ प्रश्न सोडविण्याचा केवळ दिखाऊपणा केला जात आहे.
दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर दुकानात भरलेला माल भिजताना हतबलतेने पहावा लागला.
अन्नधान्याचा चिखल झाला. पुणे बदलतय की पुणे तरंगतय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे.
देशात, राज्यात आणि पुण्यात एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे मोठे स्वप्न दाखविले.
मात्र, भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला, हे सोमवारी झालेल्या पावसाने उघड केले.
शहरातील मूळ समस्या सोडविण्याचा केवळ दिखाऊपणा केला गेला.
शोभेची कामे करण्यातच भाजपने रस दाखविला, असे देखील शिवसेनेच्या पत्रात म्हंटले आहे.

 

Web Title :- Shivsena | shivsena slams in saamana editorial bjp govt over miss management in pune after heavy rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’