नकली शिवभक्ती काय कामाची ? शिवसेनेचा भाजपावर ‘निशाणा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविला. त्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर बोचरी टीका करण्यात आली आहे. कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. या विषयावर महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

अयोध्येत पंतप्रधान मोदी रामजन्मभूमीवर शिवरायांचा जयजयकार करतात, पण कर्नाटकात जणू बाबरीच पाडल्याच्या ऐटीत शिवरायांचा पुतळा हटवला जातो. कर्नाटकात काँगेसचे वगैरे सरकार असते तर महाराष्ट्रात सांगली, सातार्‍यात तरी भाजपने नक्कीच धुमाकूळ घातला असता. आता कसे थंड पडले आहेत ते बघा! ही नकली शिवभक्ती काय कामाची? असा सवाल विचारण्यात आला आहे. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे.

त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक आहे. तिकडे अयोध्येत पंतप्रधान मोदी रामजन्मभूमीवर शिवरायांचा जयजयकार करतात, पण कर्नाटकात जणू बाबरीच पाडल्याच्या ऐटीत शिवरायांचा पुतळा हटवला जातो. कर्नाटकात काँगेसचे वगैरे सरकार असते तर महाराष्ट्रात सांगली, सातार्‍यात तरी भाजपने नक्कीच धुमाकूळ घातला असता. आता कसे थंड पडले आहेत ते बघा! ही नकली शिवभक्ती काय कामाची? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

सध्याचे भाजपशासित राज्यकर्ते बोलतात एक व करतात दुसरेच. युगपुरुष, देवादिकांच्या नावाचा वापर ते राजकीय स्वार्थासाठीच करीत असतात. महाराष्ट्रातील मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजीराजांचे आशीर्वाद आपल्यालाच आहेत असा प्रचार त्यांनी केला, पण त्यांच्या कार्यकाळात शिवरायांच्या स्मारकाची वीट रचली गेली नाही. अशा अनेक सोंगाढोंगांच्या गोष्टी सांगता येतील. यांचे शिवरायप्रेम हे ढोंग आहे हे सिद्ध करणारी दुर्घटना बाजूच्या कर्नाटक राज्यात घडली आहे.