Shivsena Sushma Andhare | शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; म्हणाल्या – ‘मोदी, शहा, फडणवीस जिंकलाय तुम्ही, शिंदे जिंकले नाहीत ते फक्त टूल, तुम्ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Sushma Andhare | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे धनुबाण पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली आहे. विविध पक्षांचे नेतेही यावर आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shivsena Sushma Andhare) यांनी पक्षचिन्ह गोठवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे.

 

सुषमा अंधारे (Shivsena Sushma Andhare) यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Prime Minister Narendra Modi), अमित शाहजी (Amit Shah), देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) जिंकलाय तुम्ही. तुमचे कुटील राजकारण जिंकलेय, मुख्यमंत्री एकनाथ जिंकले नाहीत, ते फक्त टूल आहेत, ते टूल वापरून तुम्ही डाव रचला. पण, जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब लांब पडतात ना, तेव्हा समजून जावं की अंधार जास्त पडत चाललाय. खूप अंधार पडत चाललाय. आम्ही उजेडासाठी लढत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, खडकातूनही उगवून येऊ. या कारस्थान पाठीमागे भाजप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही (Mahavikas Aghadi) कोणताही परिणाम होणार नाही.
सेनेला आता तात्पुरते नवे नाव शोधावे लागणार आहे.
मी असे नाव सुचविन की, शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray),
असे नाव द्यायला पाहिजे. हे असे याअगोदर काँग्रेसमध्ये (Congress) झाले आहे.

दरम्यान, चिन्ह गोठवल्याने शिवसेना आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By-Election) कोणते चिन्ह आणि नाव वापरणार यावर चर्चा सुरू आहे.
तसेच अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाला सुद्धा उमेदवार उभा करावा लागेल.
अन्यथ शिंदे गट अडचणीत येऊ शकतो. कारण दुसरीकडे या जागेसाठी भाजपाने आपल्या संभाव्य उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
शिंदे यांनी उमेदवार उभा केला नाही तर आयोगाला इतका खटाटोप का करायला लावला याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

 

Web Title :- Shivsena Sushma Andhare | we shall spring from the rock the path of light told by dark darkness warning to bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | 40 डोक्याच्या रावणानं प्रभु रामाचं शिवधनुष्य गोठवलं, हे आता अति होतंय; उद्धव ठाकरे आक्रमक (व्हिडिओ)

Pune Crime | ‘जमतारा पॅटर्न’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’