काँग्रेस पक्षाला ‘कपालभाती’ करण्याची गरज, शिवसेनेची टिका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काल साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या राजकीय विरोधकांना उपरोधिक शैलीत चिमटे काढले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखात यासंबंधी शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या नशीबात राजयोग नसल्यामुळे त्यांना आता शवासनाची गरज असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच विरोधकांकडे पाच वर्षांचा भरपूर वेळ असल्याने त्यांनी पाच वर्ष ‘कपालभाती’ योग करत रहावा. लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष अडगळीत पडला असताना विरोधक त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीकेचे बाण सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग’ दिवस साजरा केला. त्यांच्यामुळे भारतीय योग जगात पोहचला ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. नरेंद्र मोदी यांच्या नशिबात राजयोग असल्याने ते सत्तेत आहेत. त्यामुळेच नक्कीच योगा आणि सत्ता यांचा संबंध आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळे मोदी हे अठरा अठरा तास काम करत असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने राजयोग आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसने पुढील पाच वर्ष शवासन करावे असा उपरोधिक टोला देखील या अग्रलेखातून लावण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी राहुल गांधी हे मोबाईलमध्ये व्यस्त दिसले होते,त्यावर टीका करताना म्हटले आहे कि, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गुरूवारी संसदेच्या सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना ‘मोबाईल योग’ करताना दिसले. हादेखील राजयोग नसल्याचा परिणाम असल्याचा टोला त्यांना लावण्यात आला. राहुल गांधी यांच्याबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्यावर देखील या अग्रलेखातून टीका करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु