Shivsena Thackeray Group | उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shivsena Thackeray Group | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. सेनेत दोन गट आस्तित्वात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपसोबत (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांवर पोलिस आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या पक्षातील आमदार (MLA), खासदार (MP), उपनेते (Deputy Leader), नगरसेवक (Corporators) आणि प्रमुख पदाधिऱ्यांना (Key Officials) एक महत्वाची सुचना केली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Shivsena Thackeray Group)

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप (Phone Tapping) केले जाण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊनच उद्धव ठाकरे यांनी ही सूचना केली असल्याचे बोलले जात आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे (Ambadas Danve) म्हणाले, ‘अशा कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. पण, सध्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरलं होत असतात. त्यामुळे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आयफोन वापरावा. अशा सूचना जिल्ह्यात दिल्या आहेत.’ असे स्पष्टीकरण यावेळी बोलताना विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले. (Shivsena Thackeray Group)

तर, यावर पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘तत्कालीन सरकारने रश्मी शुक्लाला (Rashmi Shukla)
फोन टॅपिंग करण्यास सांगितलं होतं. सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं.
आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे.
त्यामुळे सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार गैरफायदा घेऊ शकतं.
म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही देत असतो.’ असे यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

Web Title :- Shivsena Thackeray Group | shivsena shivsanainik use i phone say opposition leader ambadas danve

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही