युतीच्या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरुवात, जाणून घ्या काय झालं ते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा होण्याच्या आधी आणि घोषणेनंतर देखील दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. युतीमध्ये कोणत्या जागांची आदलाबदल होईल, कोणत्या जागांची आदलाबदल झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, शिवसेनेने एबी फॉर्म वाटपाला सुरुवात केल्याने नाराज नेत्यांनी मातश्रीकडे धाव घेतली आहे. या ठिकाणी नाराज नेते जमा झाले असून त्यांची समजूत उद्धव ठाकरे काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

युतीमुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले असून विद्यमान आमदार संजय केळकर यांनी उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे इच्छूकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. युतीचा धर्म म्हणून ठाण्यात शिवसैनिकाला ठाणे शहराची जागा सोडावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. सभागृह नेते नरेश म्हस्के आणि नगरसेवक संजय भोईर हे ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सेनेच्या तिकीटावर इच्छूक आहेत.

ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाही अशी घोषणाबाजी कार्य़कर्त्यांनी शहर कार्यालयाबाहेर केली. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असो अशा घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्याता आहे.

शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा गट असे दोन गट तयार झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा गट वेगळा पडलाय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या वादाची पहिली ठिणगी कल्याणमध्ये पडली आहे. युतीमुळे शिवसेना-भाजपच्या इच्छुकांची डोकेदुखी पहायला मिळत आहे.

युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतील असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरे व्यस्त असल्याने आणि देवेंद्र फडणवीस नागरपूर येथील कार्य़क्रमात व्यस्त असल्याने दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रक काढून युतीची घोषणा केली.

Visit : Policenama.com