Shivsena | लोढांवर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी कोल्हापुरात शिवसैनिक आणि पोलिसांत बचाबाची

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली होती. त्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. महाविकास आघाडीने मंगलप्रभात लोढा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यातून आज कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात लोढा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे कार्यकर्ते गेले होते. मात्र, पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याने पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये (Shivsena) मोठी बाचाबाची झाली.

 

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रवीकरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक गेले होते. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कटकधोंड यांना निवेदन देण्यात आले. मात्र, तक्रार नोंदवून न घेता फक्त निवेदनाची पोच देण्यास पोलिसांनी तयारी दाखविली. त्यावरून वाद उसळला आणि पोलीस विरुद्ध शिवसैनिक संघर्ष सुरू झाला. उपस्थित शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मंगलप्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून, त्यांना भेटून सदर निवेदन देण्यास दोन्ही जिल्हाप्रमुख व शिवसैनिक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाले.

मात्र, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी करत सदर तक्रार नोंद करून घेत,
सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यास सांगितले. यावरून येत्या काळात मंगलप्रभात लोढा,
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री सुधांशू त्रिवेदीसह छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात
आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने मागील काळात राज्यपाल कोश्यारी
यांच्या विरोधात महाराष्ट्र बंदचादेखील इशारा दिला होता. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Shivsena | the demand of shiv sainiks file case against mangal prabhat lodha there ruckus between the police and shiv sainiks kolhapur news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय