×
Homeताज्या बातम्याShivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही...हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने 'रोखठोक'...

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्रातील वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane) व राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच (Shivsena) दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या (BJP) पाठिंब्यातून निर्माण झाला, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरात म्हटले आहे.

 

या लेखात पुढे म्हटले आहे की, शिवतीर्थावरचा (Shivtirtha) दसरा मेळावाच (Dasra Melava) खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट (Shinde Group) त्यांचीच शिवसेना (Shivsena) खरी असे मानून दसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ’दिघे’ होता येत नाही. काही जण ’शिंदे’ होतात…दिघे नक्की कोण होते?

 

महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला.
दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ’धर्मवीर’ सिनेमा काढला.
सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला.
हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला.
कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी.
या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले.
चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे.
या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली!, असे या लेखात म्हटले आहे

 

Web Title :- Shivsena | this head is not shindes bjps conspiracy serious allegations against bjp and eknath shinde targeting by shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | डॉक्टरकडून 4 लाखाची खंडणी घेताना पत्रकारासह महिला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News