Shivsena UBT Group | उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना हायकोर्टाची नोटीस; ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या जनता न्यायालयामुळे आमदार अपात्रताबाबत पुन्हा चर्चा सुरु असतानाच त्यांच्या गटाच्या (Shivsena UBT Group) १४ आमदारांना उच्च न्यायालयने (Mumbai High Court) नोटीस बजावली आहे. त्यावर त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

योगेश गोगावले यांच्या याचिकावर हा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे उबाठा गटात १६ आमदार असताना गोगावले यांनी आदित्य ठाकरे व ऋतुजा लटके यांना वगळले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांना अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ तर शिंदे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. मग शिंदे गटाकडून देण्यात आलेला व्हीप कसा लागू होत नाही? तो न मानणार्‍या ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत.. न्यायालयाने उर्वरित सर्व आमदारांना नोटीस बजावत ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘मला शक्ती भाई म्हणतात’ दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर FIR; मंगळवार पेठेतील प्रकार