Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज’ – उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी (Financial Capital) म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून चौफेर टीका होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari) यांनी तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची संस्कृती (Maharashtra Culture) पाहिली असेल, पण त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याचीही गरज आहे. महाराष्ट्राकडून सर्व ओरबाडले आणि महाराष्ट्राचा आता अपमान केला जात आहे.

 

ठाकरे पुढे म्हणाले, राज्यपालपदाचा अवमान करू इच्छित नाही. कारण ते मानाचे पद आहे. राष्ट्रपतींचे ते दूत असतात. मात्र, एक गोष्ट सत्य आहे की, त्या खुर्चीचा मान, त्या खुर्चीत बसवलेल्यांनीही राखायला पाहिजे. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी तो मान राखला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची वक्तव्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्याच नशिबी अशी लोक का येतात, हा प्रश्न पडतो. (Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari)

ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या (Lockdown) स्थितीतही या राज्यपालांना सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी त्यावेळी उत्तर दिले.
जबाबदारी पार पाडली. मध्यंतरी सावित्रीबाई फुलेंबाबतही (Savitribai Phule) वक्तव्य त्यांनी केले होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी माणसांचा अपमान केलाच आहे, शिवाय त्यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचाही प्रयत्न केला आहे.

 

ठाकरे पुढे म्हणाले, ही मुंबई कोश्यारी यांनी मुंबईकरांना आंदण दिलेली नाही.
जातीपातीत आग लावण्याचे काम करणार्‍यांना फक्त घरी पाठवावे का तुरुंगात पाठवावे ? ज्या महाराष्ट्राचे मीठ खाता त्या मिठाशी नमकहरामी केली आहे.
नवहिंदुत्व असलेल्या सत्ताधारी नवहिंदूंनी राज्यपालांबाबत भूमिका घेतली पाहिजे.
कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची शान घालवली. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.
त्यांच्या पोटात बसून कोणी त्यांच्या ओठावर हे वक्तव्य आणले आहे ते पहावे लागेल.

 

Web Title : – Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा