Shivsena | उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, विदर्भातील ‘हा’ बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हाताशी घेऊन शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. यासाठी सर्वप्रकारची मदत भाजपाने (BJP) सुरूवातीला पडद्यामागून आणि नंतर उघडपणे केली. यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता हाती घेतली. भाजपाने केलेल्या या कृतीला आता शिवसेना (Shivsena) उत्तर देताना दिसत आहे. लवकरच भाजपामधील एक माजी मंत्री शिवसेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भातील भाजपा नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना 19 ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहेत.

संजय देशमुख यांचा यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघात (Digras Constituency) मोठा प्रभाव आहे. देशमुख हे शिंदे गटातील नेते आणि राज्य सरकारमधील वादग्रस्त मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. भविष्यात उद्धव ठाकरे हे देशमुखांच्या माध्यमातून संजय राठोडांना मोठे आव्हान निर्माण करू शकतात. संजय राठोड हे पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरूणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येनंतर चर्चेत आले होते, यानंतर त्यांना मंत्रीपद देखील सोडावे लागले होते.

दरम्यान, संजय देशमुख यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेऊ शकतात.
शिवसेनेतील फुटीनंतर अनेक नेते साथ सोडून जात असताना संजय देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या
नेतृत्वातील शिवसेनेला विदर्भात मोठे बळ मिळू शकते.
संजय देशमुखांचा शिवसेनेतील प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे.

Web Title :- Shivsena | uddhav thackerays counter attack on bjp blasted former minister of vidarbha sanjay deshmukh will tie shivbandhan on october 19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Virat Kohli | तमिळनाडूतील ‘त्या’ हत्येच्या प्रकरणात होत आहे विराट कोहलीच्या अटकेची मागणी

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…