Shivsena Vs BJP | माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Vs BJP | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका असे वक्तव्य केले आहे. याच वक्तव्यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला (Shivsena Vs BJP) आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल (Governor of Nagaland) होणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असे म्हटले असावे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांतदादा हे अवतारी पुरुष
संजय राऊत पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात (politics) आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरुष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो.

 

स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही

मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच रहावं लागणार आहे. कारण उद्धवजींच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात राज्यातील सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे पाटलांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल, असे राऊत म्हणाले.

मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.
मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभले आहे. भाजप कायम आघाड्या करुन सत्तेत येत होता.
परंतु वाजपेयी नंतर मोदींनीच भाजपला शिखरावर नेले.
मोदींच्या नेतृत्त्वात भाजपची एकहाती सत्ता आली हे विसरुन चालणार नाही.
त्यांच्या नेतृत्वाची ती कमाल असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Web Titel :- Shivsena Vs BJP | i have heard chandrakant patil will be governor nagaland my best wishes him says sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

Pune Crime | जामीनावर सुटलेल्या गुंड सुरज रसाळवर टोळक्याकडून कोयत्याने वार; उंड्रीमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Nitin Gadkari | नितिन गडकरींनी अनेक वर्षे पत्नीपासून लपवले हे मोठे गुपित, रस्त्यासाठी पाडले होते सासर्‍याचे घर