Shivsena Vs BJP | शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात: नारायण राणे

रत्नागिरी /सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –  Shivsena Vs BJP | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व सुटका नाट्यानंतर कोकणात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील दुसरा अंक पाहायला मिळाला. पोलीस कारवाईमुळे थांबलेली जनसंघर्ष यात्रा रत्नागिरी शहरातून पुन्हा सुरु करण्यात आली तर तिचा समारोप सिंधुदुर्ग येथे करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी राणेंनी नेहमीच्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. एवढेच नाही तर शिवसेनेच्या (Shivsena Vs BJP) नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

नारायण राणे म्हणाले, शिवसेनेत अनेक नाराज आमदार आहेत. ते सर्व माझ्या संपर्कात आहेत.
राणेंच्या पाठीमागे लागू नका, मी आता थोडं बोलतोय, मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला ते परवडणार नाही असा इशारा देत खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत हे दोघेही शिवसेनेला बुडवतील. रत्नागिरीमध्ये माझ्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर असून जबरदस्तीने करण्यात आली होती असेही त्यांनी म्हंटले.

 

राणे म्हणाले, कायदेशीर कारवाई करा पण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला तर सामोरे जावे लागेल असा इशारा देत कोरोनाने सव्वा लाखाच्यावर लोकांचा मृत्यू झाला.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत ही यांची ख्याती. बंधने फक्त नारायण राणे यांच्यासाठी.
देशात राहतो आम्हाला मनाई का? सत्तेची मस्ती आहे दुसरे काही नाही.
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. जन आशीर्वाद यात्रेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून लोकांचे प्रश्न जाणून घेता आले.
कोकणच्या सुपुत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं.
मी त्यांचा आभारी आहे.
रत्नागिरीतील पूर, वादळामुळे झालेल्या नुकसानीची तसेच शासनाकडून काही मदत मिळाली कि नाही याची माहिती घेऊन याचा एकत्रित अहवाल पंतप्रधान मोदींना सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title : Shivsena Vs BJP | narayan rane says many shiv sena mlas touch with me jan ashirwad yatra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

Mumbai High Court | राज्य शासनाच्या शालेय ‘फी’ कपातीच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान

Sandeep Pawar Murder Case | नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात पुण्यातील गँगस्टर सुनिल वाघ पोलिसांच्या जाळयात; आतापर्यंत 24 जणांना अटक