Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना (Shivsena Vs BJP) यांच्यातील धुसफूस वाढत चालली आहे. शिवसेनेच्या प्रत्येक निर्णयावर किंबहुना कृतीवर भाजपकडून प्रहार केला जात आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल अशी टीका भाजपकडून वारंवार केली जात आहे. त्यावरच शिवसेनेने आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केली आहे. हि भूमिका स्पष्ट करताना भाजपवर सडकून टीकाही केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी जम्मू- काश्मिरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? महाराष्ट्रात शिवसेनेनं काय करायला हवं आणि काय केले याचे सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवर असणाऱ्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्यावा. राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा म्हणजे हिंदुत्व नाही. गोमांसावरून एका राजय्त लोकांना ठार करायचं आणि दुसऱ्या राज्यात तेच गोमांस विकायला परवानगी द्यायची. हे तुमचं हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. आता हिंदुत्त्वावर प्रवचने देणे बंद करा. काश्मिरातील हिंदूंच्या किंकाळ्याने ज्यांची मने द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने देऊ नये अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका (Shivsena Vs BJP) केली आहे.

 

महाराष्ट्रात बेगडी हिंदुत्त्ववादी आहेत. ते ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले हो’ म्हणून कंठशोष करीत आहेत. पण बांगलादेशातील हिंदूंची होत असलेली राखरांगोळी दिसत नाही किंवा चिंतामग्नही होत नाही.
काश्मीर, बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करण्याचे कर्तव्य मोदी सरकारचेच आहे.

 

हिंदू हा असा खतरे में आला असताना फुकाची प्रवचने झोडण्यात काय हशील? अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर येथे मोदी सरकारने (Modi Government) दोन मंत्र्यांना ठाण मांडून बसवायला हवे.
आणि जी काही पोपटपंची करायची ती तिकडे करा असे सांगायला हवे असा टोलाही (Shivsena Vs BJP) अग्रलेखात लगावला आहे.

 

काय म्हंटले आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात

 

सत्तेसाठी भाजपमध्ये शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्व कसं सोडल याची प्रवचने देत आहेत.
खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही. आजची परिस्थिती पहिली तर देशातील हिंदू खतऱ्यात आहे.
हा मजकूर लिहिताना आमचे काळीज कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने अस्वस्थ झाले आहे.
भीतीच्या सावटाखालील कश्मिरी पंडितांनी मोठय़ा प्रमाणावर पलायन सुरू केले आहे. कशिमर खोऱ्यात ९० च्या दशकात अशीच तणावाची स्थिती होती.
खोऱ्यातील २२० हिंदू शीख कुटूंबानी निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे काही (नव) हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही.
शिवसेनेनला हिंदुत्त्वाचे धडे देणाऱ्यांना कश्मीरातील हिंदूंचे पलायन आणि हत्या दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते.

 

काश्मीर असो व बांगलादेश तेथे हिंदूंच्या मंदिरावर हल्ले सुरूच आहेत. वस्त्या जाल्ल्या जात आहे. हिंदू मुलींच्या इज्जतीवर हल्ले सुरू आहेत.
भीतीच्या सावटाखाली संपूर्ण बांगलादेशात हिंदू समाज कसाबसा जगत आहे. तेथेही असेच एक पाठ पाठवून तेथील हिंदूंना दिलासा द्यायला हवा.
हिंदुत्व रक्षणासाठी भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर बांगलादेशावर लष्करी कारवाई करण्याचेच सुचवले आहे.
म्हणजे खतऱ्यात सापडलेल्या हिंदुत्वाबाबत भावना किती तीव्र आहेत ते पाहा.
जे उपटसुंभ शिवसेनेस हिंदुत्वाचे प्रवचन देत आहेत त्यांनी दिल्लीत मोदी-शहांची भेट घेऊन कश्मीर आणि बांगलादेशातील हिंदू खतऱ्यात सापडला असताना सरकार असे थंड का बसले आहे? असा जाब विचारायला हवा.

हिंदूंच्या घरांना आगी लावणे, हिंदूंना पळवून लावणे त्यांच्या संपत्तीवर कब्जा करणे असे प्रकार बांगलादेशात घडत आहे. आता काश्मीर खोऱ्यातही तेच घडत आहे.
नव्वदच्या दशकात आपली संपत्ती, घरेदारे मागे सोडून पंडितांनी पलायन केले होते. त्यानंतर १९९७ मध्ये सरकारने एक कायदा बनवला.
संकटकाळात अचल संपत्ती खरेदी-विक्रीच्या विरोधात हा कायदा होता, पण कायद्याची पर्वा न करता कश्मिरी पंडितांची संपत्ती कवडीमोल भावात विकण्यात आली.
आता नव्याने कश्मिरी पंडितांना त्यांचे हक्क, इतरांनी ताब्यात घेतलेला त्यांचा जमीन-जुमला परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
साधारण अशा एक हजार जणांना त्यांची संपत्ती परत करण्याची प्रक्रिया सुरू केली. जम्मू-कश्मीर सरकारने एक ‘पोर्टल’ सुरू केले.

 

त्यात कश्मिरी पंडितांना त्यांची संपत्ती परत करण्याची ‘ऑनलाइन’ प्रक्रिया सुरू केली. या पोर्टलची जाहिरातही केली.
अनेकांना असे वाटले की, आता अचानक जी हिंसा खोऱ्यात भडकली आहे त्यामागे हे संपत्तीचे कारण असू शकेल.

 

या पोर्टलचे उदघाटन राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते झाले, त्या दिवशीच राज्यपालांच्या कार्यालयाने जाहीर केले की, खोऱयातून जवळजवळ ६० हजार हिंदूंनी पलायन केले होते.
त्यातील ४४ हजार कुटुंबांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन आयुक्तांकडे आपली नोंदणी केली होती. ४४ हजार परिवारांत ४०,१४२ हिंदू, १७३० शीख आणि २६८४ मुसलमान परिवारांचा समावेश आहे.
स्वतंत्र हिंदुस्थानात आपल्याच देशात नागरिकांना आपली घरेदारे सोडून जावे लागत आहे.

निर्वासितांच्या छावण्यांत दिवस काढावे लागतात, हे काय हिंदुत्वाची प्रवचने झोडणाऱया राज्यकर्त्यांना शोभा देते काय?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही भाजप प्रचार सभांतून ‘हिंदू खतरे में’ अशी आरोळी मारली जात होती, पण प. बंगालातील हिंदू मतदारांनी शेवटी ममता बॅनर्जींनाच विजयी केले.
हे असे आपण का आपटलो? हे नव हिंदुत्ववाद्यांनी स्वतःलाच विचारायला हवे.

 

मतांसाठी हिंदुत्त्वाचा, हिंदू-मुसलमानांमध्ये निर्माण करणाऱ्या खेळाला आता हिंदूही विटला आहे.
जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह शिवसेनेला सत्तेसाठी हिंदुत्त्व सोडले म्हणणारे विसरलेत का?
तुमचा तो निकाह म्हणे व्यापक राष्ट्रीय हितासाठी! काश्मीरमध्ये तर तेथे तर सरळ सरळ फुटीरतावादी, अतिरेक्यांशी हातमिळवणी करूनच सत्तेचा शिरकुर्मा चापला होता.
त्या शिरकुर्म्याची दातांत अडकलेली शिते तशीच ठेवून शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण आहे.
केवळ हिंदूच खतऱ्यात नाही तर हिंदुस्थान खतऱ्यात आहे! १०० कोटी लसीचे उद्दिष्ट झाले म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशातला सगळय़ात मोठा तिरंगा लालकिल्ल्यावर फडकविला हे योग्यच झाले;
पण चिनी, पाकडे, बांगलादेशी ज्या बेदरकारपणे सीमेवर धडका मारीत आहेत ते पाहता तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे काय? याचा विचार करावा लागेल.
सावरकरांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्ताची बदनामी करायची, सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी आली की, मूग गिळून बसायचे.

हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचने आता बंद करा!
कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

 

Web Title : Shivsena Vs BJP | shivsena target bjp over attack hindu bangladesh kashmir today’s saamana editorial

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

क्रिप्टोच्या बाजारात CoinSwitch Kuber चा बोलबाला, क्रिप्टो संबंधित सर्व गरजा करत आहे पूर्ण

Pune Crime | 50 हजारांची नुकसान भरपाई न दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न; बंडगार्डन पोलिसांनी केली दोघांना अटक

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध