Shivsena Vs BJP | 2024 मध्ये उद्धव ठाकरे PM पदाचे प्रबळ दावेदार, म्हणून भाजपने सरकार पाडले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Vs BJP | राज्यात पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राहिले तर, 2024 साली ते पंतप्रधान (Prime Minister) पदाचे प्रबळ दावेदार होतील, या भीतीमुळेच भाजपाने सरकार पाडले. प्रत्येक राज्यात जे भाजपाविरोधी पक्ष आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्या चेहर्‍यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिले आणि आपल्याला पायउतार व्हावे लागले, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी म्हटले. सरदेसाई यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला असून ते ठिकठिकाणी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) निशाणा साधत आहेत. ते उस्मानाबादेत युवासेना (Yuvasena) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. (Shivsena Vs BJP)

 

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी युवासेना प्रमुखपदी मुख्यमंत्री पूत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवताना सरदेसाई यांनी म्हटले की, युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आहेत. बाकी कुणाला काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळं असतात त्यामुळे असे मंडळ कुणाला स्थापन करावसे वाटत असेल तर तो त्यांचा विषय आहे. (Shivsena Vs BJP)

सरदेसाई पुढे म्हणाले, प्रत्येक गणपती मंडळाला सुद्धा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारणी असते. परंतु यांच्या संघटनेला फक्त सचिव आहे. त्याला डोकंपण नाही आणि पाय पण नाहीत. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करत आहेत त्यांच्यामागे राज्यातील जनता उभी राहत आहे. गेल्या 2 महिन्यात आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक भागात फिरत आहेत. जनताही त्यांना कसा प्रतिसाद देतेय हे मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे.

 

Web Title :- Shivsena Vs BJP | uddhav thackeray is a strong contender for the post of
prime minister in 2024 so bjp toppled the government varun sardesain in osmanabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा