Shivsena Vs MNS | शिवसेना-मनसेत जुंपली ! दानवे म्हणाले – ‘मनसे भाजपाची दुसरी शाखा, संदीप देशपांडेंनी दिले प्रत्युत्तर’

नवी दिल्ली : Shivsena Vs MNS | राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा पक्ष भाजपाची दुसरी शाखा आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजर्‍यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. (Shivsena Vs MNS)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी विदर्भ दौर्‍यावर असून ते मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करत आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा सुरू असताना शिवसेना नेते दानवे यांनी टीका केल्याने मनसेने रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते देशपांडे म्हणाले की, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावे. शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेतृत्व खूप जुने झाले आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, त्याचे काय? (Shivsena Vs MNS)

अंबादास दानवे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, राज ठाकरे लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत फिरत होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावणार होते. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली नाही.

दानवे यांनी म्हटले होते की, राज ठाकरे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला जाणीवपूर्वक विरोध करत होते.
त्यांना भाजपाचे ते मित्र व्हायचे आहे. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते-जुळते आहे.
भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. राज ठाकरेंचा मनसे पक्ष म्हणजे भाजपाची दुसरी शाखा आहे.

Web Title :- Shivsena Vs MNS | MNS leader sandeep deshpande criticizes ambadas danve over comments on raj thackeray and mns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Changes In NPS | NPS नियमांमध्ये झाले 4 मोठे बदल; ई-नामांकनपासून विदड्रॉलपर्यंत का भासली ‘या’ बदलांची गरज