Shivsena Vs Narayan Rane | ‘जास्त बोलायचं नाही, उलट-सुलट बोलाल तर याद राखा’, शिवसेनेचा नारायण राणेंना थेट इशारा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Vs Narayan Rane | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करण्यापूर्वी नारायण राणे (Narayan Rane) यांनी बंड केले होते. या बंडाची जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद (Shivsena Vs Narayan Rane) वाढत गेले. गुरुवारी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता यावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया आली असून शिवसेनेने नारायण राणे यांना थेट इशारा दिला आहे.

उलट-सुलट बोलाल तर याद राखा

नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रत्युत्तर देताना जाहीरपणे इशारा दिला आहे. यांना समजत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) आशीर्वादाने तुम्हाला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे, ती अजून वाढू देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं. काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही जर मोठे झाले असाल, तर कुणामुळे झाले हे लक्षात ठेवा. यानंतर जास्त काही बोलू नका. तुम्ही वाईट बोललात तर आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही मग काहीही बोलू, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. (Shivsena Vs Narayan Rane)

काय म्हणाले नारायण राणे?

शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षाचे होते, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे, आता गटप्रमुखांची बैठक घेतात इथपर्यंत आले आहेत, असा चिमटा काढत अडीच वर्षात किती गटप्रमुखांना भेटले. अडीच वर्षात मंत्रालयात तीन तास बसले. अडीच वर्षात काय केलं? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते राजकारणात सक्रिय झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारली का ? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना घरुन कोणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झाले, तूही कार्यरत रहा, मुख्यमंत्री होशील. म्हणून ते शिवसेनेत आले. तोपर्यंत ते शिवेनेत सक्रीय नव्हते, असं राणे यांनी म्हटले होते.

Web Title :-  Shivsena Vs Narayan Rane | shivsena chandrakant khaire slams narayan rane targeting uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)

Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण