Shivsena vs Shinde Group | ठाण्यात शिवसेना-शिंदे गटात राडा, अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप, 13 शिवसैनिकांना अटक होण्याची शक्यता, गुन्हा दाखल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि शिंदे गटातील (Shivsena vs Shinde Group) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतील प्रभादेवी आणि दादर येथे या दोन गटात झालेल्या वादानंतर आता ठाण्यात पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. दसरा मेळाव्याला (Dasra Melava 2022) निघालेले असताना ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गट (Shivsena vs Shinde Group) आमने-सामने आले आणि एकमेकांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. ठाणे पोलिसांनी (Thane Police) या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला असून याप्रकरणी 13 शिवसैनिकांना (Shiv Sainik) अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे आता ठाण्यातील वातावरण तापले आहे. पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेवून चौकशी केली.

 

दसरा मेळाव्याकरता ठाण्यातून शिवसेना खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे सभेकरता निघाले होते. याच दरम्यान काही शिवसैनिकांनी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या विरोधात अश्लिल भाषेत घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी पोलिसांसमोर झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Shivsena vs Shinde Group)

कलम 153 – चिथावणी खोर वक्तव्य, कलम 294 – अश्लिल कृत्य करणे, कलम 188 – आदेशाचा भंग, 37 (1),
37 (3) – 5 पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवणे, कलम 135 – मनाई आदेशाचे उल्लंघन करणे
तसेच सांगून देखील आदेशाचे पालन न करणे या कलमांतर्गत ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 13 पैकी 8 शिवसैनिकांची ठाणे नगर पोलिसांनी चौकशी केली.
तर 5 शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलावले आहे.
जर या शिवसैनिकांनी तपासात सहकार्य केले नाही तर त्यांना अटक देखील होवू शकते, असे समजते.

 

Web Title :- Shivsena vs Shinde Group | thane police may arrest 13 shivsena party workers who supports uddhav thackeray over misbehave

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना