Shivsena | अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला ‘ढाल तलवार’ मिळाली आहे – शीतल म्हात्रे (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा गेले तीन महिने सुरु असलेला वाद अखेर काही काळासाठी निकालात निघाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दोन्ही गटांच्या वादावर हंगामी निर्णय घेत आदेश जारी केला आहे. शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) गोठविण्यात आले आहे. त्यामुळे आता दोनही पक्षांना नवीन नावे आणि पक्षचिन्हे मिळाली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला ‘मशाल’, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाले आहे.

 

त्यावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला (Shivsena) म्हणजे शिंदे गटाला (Shinde Group) ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. हे चिन्ह नवीन नसून ते जुनेच आहे. आम्हाला या चिन्हाच्या माध्यामातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ही ढाल तलवार (Shield – Sword Symbol) आम्हाला मिळाली आहे, असे आम्हाला वाटते, असे म्हात्रे म्हणाल्या.

 

तसेच या ढाल तलवारीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळात अन्यायाविरोधात नक्कीच आवाज उठविणार आहोत.
तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचे जुने निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावर देखील दावा केला.
मिळालेले ढाल तलवार चिन्ह हे हंगामी आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन नक्कीच आवाज उठवू, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

 

Web Title :- Shivsena | We have got a ‘Shield Sword’ to fight injustice – Sheetal Mhatre (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा