ताज्या बातम्यामुंबईराजकीय

Shivsena Whip Sunil Prabhu | शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर ! बंडखोर 39 आमदार अडचणीत, आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Whip Sunil Prabhu | महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व 39 बंडखोर आमदारांना पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता. परंतु आमदारांनी उघडपणे सत्ताधारी बाकांवर बसत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. यानंतर अपेक्षेप्रमाणे शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. व्हीप न पाळणार्‍या आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीची याचिका शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. (Shivsena Whip Sunil Prabhu)

 

रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना 164 मते मिळवली आणि ते अध्यक्षपदी विराजमान झाले. यावेळी शिवेसेनेच्या सर्व 39 बंडखोर आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केल्याचे उघड झाले. बंडखोरांपैकी कुणीही शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना मत दिले नाही. यामुळे साळवी यांचा पराभव झाला. आता शिवसेना आक्रमक झाली असून बंडखोरांवर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. (Shivsena Whip Sunil Prabhu)

 

या संदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केले. याच पार्श्वभूमीवर 39 आमदारांच्या निलंबनाची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

विधानभवन सभागृहात झालेल्या मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे.
पक्षाचा व्हीप असूनही पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करणार्‍या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी,
अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

 

दरम्यान, शिंदे गटानेही व्हीप काढला असून त्यांनीही शिवसेनेच्या उर्वरित 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचे अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का? शिवसेना रजिस्टर पक्ष आहे,
पक्षाला मान्यता आहे. दोन तृतीयांश आमदार असल्याचे सांगून भ्रम निर्माण केला जात आहे.
विधिमंडळ कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे असल्याच्या बातम्या चुकीच्या, उद्या कार्यालय उघडेल, अशी माहिती खा. अरविंद सावंत यांनी दिली.

 

Web Title :- Shivsena Whip Sunil Prabhu | take action against 39 mlas violating shiv sena whip sunil prabhu demand to the speaker of the assembly rahul narvekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला, सरनाईक-जाधवांच्या वेळी ‘ED-ईडी’ची शेरेबाजी

Back to top button