Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब कोण?, किशोरी पेडणेकरांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोनही आता तात्पुरते कालबाह्य झाले आहेत. कारण शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वादावर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) हंगामी आदेश जाहीर करत, शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) गोठविले आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नावाचा वापर करता येणार नाही. शिवसेनेने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत आपल्या गटासाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) असे नाव निवडणूक आयोगाला पाठविले. तसेच त्यांना निवडणूक निशाणी म्हणून मशाल (Mashal Symbol) हे चिन्ह मिळाले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील आपले नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Shivsena of Balasaheb) असे निश्चीत केले आहे. त्यांना अद्याप निवडणूक चिन्ह मिळाले नाही. तसेच त्यांनी निश्चित केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावर विरोधकांनी त्यांची चांगलीच चेष्टा केली आहे.

बाळासाहेब भरपूर आहेत पण बाळासाहेब ठाकरे फक्त एकच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) ही नेमक्या कोणत्या बाळासाहेबांची? बाळासाहेब विखे पाटलांची (Balasaheb Vikhe Patal), बाळासाहेब थोरातांची (Balasaheb Thorat), शिर्क्यांची की बाळासाहेब निंबाळकरांची (Balasaheb Nimbalkar? असे प्रश्न प्रसारमाध्यमांवर विचारले जात आहेत. तसेच त्यांच्या पक्षाच्या नावातील खरे बाळासाहेब कोण? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या आहेत.

आम्हाला जी तात्पूर्ती निशाणी मिळाली, ती म्हणजे मशाल या निशाणीवर 1985 साली छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) विधानसभेवर निवडून गेले होते. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जी मशाल आहे, ती धगधगती आहे, असे देखील पेडणेकर म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी तर शिंदे यांच्या शिवसेनेचा संबंध थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच (RSS) लावला आहे.
कारण 1925 साली ज्यावेळी संघाची स्थापना झाली, त्यावेळी त्यात बाळासाहेब उरुस (Balasaheb Urus)
यांचा मोठा वाटा होता.
त्यामुळे शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाचा योग बाळासाहेब उरुस यांच्यासोबत देखील जोडला जाऊ शकतो.
त्यामुळे ही संघाची शिवसेना आहे का? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

Web Title :- Shivsena | Who is Balasaheb in ‘Balasaheb’s Shiv Sena’?, Kishori Pednekar asked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा