महाराष्ट्राच्या इतिहासात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळणार ‘HOME’, राष्ट्रवादीसोबत झाली ‘डील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होणार आहे की, शिवसेनेला राज्यातील गृह मंत्रालय मिळणार आहे. 1999 पासून तर 2014 पर्यंत महाराष्ट्राचं गृह मंत्रालय सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं. पण यावेळी युती धर्माच्या दबावापुढे झुकत राष्ट्रवादीनं हे महत्त्वाचं मंत्रालय शिवसेनेला देण्याचं मान्य केलं आहे.

‘होम’वर ठाकरे-पवारांची मोठी चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होऊन बराच वेळ चर्चा झाली. ही भेट वरळीत पार पडली. या दरम्यान, पोर्टफोलिओच्या वाटणीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शहरी विकास मंत्रालयाच्या बदल्यात आपल्या पक्षासाठी गृह मंत्रालयाची मागणी केली. मुख्यमत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत गृह खातं त्यांच्याकडे हवं आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधीमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

…तर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा पक्ष गृहखाते सांभाळत असेल
1995 साली शिवसेनेनं महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळीही गृह खातं भाजपकडे होतं. 1999 पासून तर 2014 पर्यंत महाराष्ट्राचं गृह मंत्रालय सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं. 2014 साली शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन केलं तेव्हाही हे खात भाजपकडेच होतं. जर यावेळी शिवसेनेला गृह खातं मिळत असेल तर असं पहिल्यांदाच होईल की, दिवंगत बाळासाहेबांचा पक्ष गृह खात सांभाळत असेल.

Visit : Policenama.com