शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला ‘पाठिंबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास तयारी दर्शविली आहे. एकनाथ शिंदेनी ही माहिती दिली. मराठा समाज, धनगर समाजापाठोपाठ मुस्लीम समाजाने सुद्धा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने केली होती. महाविकासआघाडी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असल्याचे कळते आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण देऊन महाविकासआघाडी सरकारला हे सरकार सर्व समाजासाठी काम करत असल्याचा विश्वास जनतेच्या मनात पेरायचा आहे.

गेल्या काही वर्षांपासून ५ टक्के आरक्षण मिळावे याची मागणी मुस्लीम समाज करत आला आहे. या साठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याची माहिती खासदार हुसेन दलवाईंनी दिली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी विधानसभेत यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like