हडपसर मध्ये संचारबंदीमुळे अडकलेल्या बिहारच्या नागरिकांना शिवसैनिकांचा मदतीचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  हडपसर मध्ये संचारबंदीमुळे अडकलेल्या बिहारच्या नागरिकांना शिवसैनिकांचा मदतीचा हात बिहारच्या नागरीकांनी मानले मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आभार युवासेना व भगवा रक्षक पथक पुणे यांच्याकडुन तातडीने मदत

हडपसर (प्रतिनिधी)

कोरोना विषाणुमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.पुणे शहरातील अनेक भागात रोजंदारी निमित्त महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय नागरीक अडकुन पडले आहेत.अन्नधान्य व पैशांमुळे त्यांची अडचण होत आहे, हडपसर भागात फुरूसुंगी येथे मागील ४ दिवसा पासुन बिहार येथील १० ते १२ नागरीक उड्डाणपुलाच्या शेजारी राहात आहेत. या नागरिकांनी बिहारचे शिवसेना राज्य प्रमुख कौशलेंद्र शर्मा यांना संपर्क साधला त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी किरण साळी यांना कळवले. त्यांनी युवासेना उपजिल्हा अधिकारी शादाब मुलाणी यांना सदर मजुरांना मदत करण्याचे सांगितले.शादाब मुलानी यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन संबंधित मजुरांशी संपर्क साधून त्यांना पुढील १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्यचा साठा उपलब्ध करून दिला.व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मिळालेली मदत पाहून त्या परप्रांतीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले.त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे व शिवसैनिकांचे आभार मानले.यावेळी निलेश पवार, रुपेश मोरे, मयुरेश जाधव, आकाश खैरे, मयुर शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.