Shivsena | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नवी कार्यकारिणी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Election) पार्श्वभूमिवर शिंदे गटाने (Shinde Group) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये (Byculla Assembly Constituency) शिंदे गटाकडून यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी नवीन कार्यकारिणी (New Executive) जाहीर केली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक एक डाव आखले जात आहेत.

 

ईडीच्या (ED) कारवाईमुळे अडचणीत सापडलेले यशवंत जाधव यांनी आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भायखळ्यामध्ये नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. जाधव यांनी महिला आणि पुरष पदाधिकारी नियुक्ती जाहीर केली आहे. शिंदे गटाकडून विजय लिपारे (Vijay Lipare) यांची भायखळा विधानसभा संघटकपदी निवड केली आहे. विजय लिपारे हे यशवंत जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेवर टीका
हा मतदार संघ बांधण्याचा प्रयत्न नाही. 2024 ची निवडणुक ही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातच लढणार आहोत.
त्यामुळे असे काही नाही. याचा फायदा आम्हाला होईल, असं खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी सांगितले.
तसेच जे विचार देवू शकतील त्यांनी दसरा मेळावा (Dussehra Melava) घ्यावा.
हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) दिले.
त्या मंचावरुन सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) विचार देणार का? सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हे सगळे प्रकरण आहे. त्यामुळे जे विचार मांडणार असतील त्यांना ते मिळावे.
शिंदे साहेबांना ते मिळाले पाहिजे, असं म्हणत शेवाळे यांनी शिवसेनेवर टीका केली.

 

Web Title :- Shivsena | yashwant jadhav announced a new executive member from the shinde group in byculla assembly constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…