भाजपने फसवले तर आमच्या व्यासपीठावर या : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमचं आदित्य नावाचं सूर्ययान 24 तारखेला महाराष्ट्राच्या सहाव्या मजल्यावर उतरविल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकर, रामदास आठवले यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयात वेतना असल्याचे जाणवले. भाजपने फसवले तर आमच्या व्यासपीठावर या, रडत कशाला बसता अजित पवारांसारखे, नेता कधी रडतो का ? असे सांगत संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.

बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांवर केंद्र सरकारचं काम सुरु आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री बाळासाहेबांच्या मार्गावर चाललेले आहेत. पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून पाकव्याप्त कश्मीर भारतात घ्या, अखंड महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करा. उद्धव ठाकरेंमुळे देशभरात श्रीरामाचं गजर पुन्हा होऊ लागला असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. त्याचसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतके थकले आहेत की दोघांना एकत्र येऊन वाटचाल करावी लागेल. हे लढायला उभे आहेत की गुडघे टेकून बसलेले आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघात केला. शिवसेनेच्या विजयाची सुरुवात कणकवली आणि कुडाळमधून होणार असल्याचे सांगत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला, ज्यांनी पक्ष संपवण्याची भाषा केली त्यांना शिवसैनिक धडा शिकवतील. भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी करण्याची मशीन नाही. मात्र वाल्मिकी असलेल्यांनाच आम्ही पक्षात घेतो असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Visit : Policenama.com 

You might also like